इंग्लंडच्या मरेला क्रूसवर अडकलेत 650 भारतीय कर्मचारी, अद्याप कसलीही मदत पोहचली नाही...

साम टीव्ही
गुरुवार, 11 जून 2020

परदेशात अडकलेल्या भारतीयांपर्यंत अजूनही मदत पोहचू शकली नाहीये. इंग्लंडच्या साउथहॅम्पटनजवळ मरेला क्रूसवर 650 भारतीय कर्मचारी अडकलेत. महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

परदेशात अडकलेल्या भारतीयांपर्यंत अजूनही मदत पोहचू शकली नाहीये. इंग्लंडच्या साउथहॅम्पटनजवळ मरेला क्रूसवर 650 भारतीय कर्मचारी अडकलेत. महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

साम टीव्हीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडलीय. 19 मार्चपासून म्हणजे सुमारे 84 दिवसांपासून हे सगळे भारतीय कर्मचारी या क्रूसवर अडकलेत. इंग्लंडवरून भारतात येण्यासाठी 28 मेला विमान पाठवण्यात येईल, असं या भारतीय कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं होतं, पण अजूनही विमानाचा पत्ता नाही. त्यामुळे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं आम्हा 650 भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणावं अशी विनंती या भारतीय कर्मचाऱ्यांनी केलीय.

भारतीय लोक अडकल्यानं त्यांना लवकरात लवकर मायदेशी परतण्याची मागणी केली जातेय. दरम्यान, देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 9 हजार 996 नव्या रुग्णांची नोंद झालीय. एका दिवसात वाढलेली कोरोना रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. तर काल देशात कोरोनामुळे 357 रुग्णांचा मृत्यू झालाय. एका दिवसात मृत्यू झालेल्यांचाही हा उच्चांक आहे. या नव्या रुग्णांमुळे देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 579 वर गेलीय. तर आतापर्यंत देशातील 1 लाख 41 हजार 029 रुग्णांची कोरोनावर मात केलीय. सध्या देशात 1 लाख 37 हजार 448 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 52 लाख 13 हजार 140 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून गेल्या 24 तासात 1 लाख 51 हजार पेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्यात. दरम्यान गेल्या 10-12 दिवसांपासून देशात रोजच 9 हजारांवर कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यानं देशाला कोरोनानं घट्ट विळखा घातलाय.

त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परदेशातील नागरिकांना भरतात आणणं थोडं कठीण होणार असल्याचं दिसतंय. तरी सरकारनं याबाबत प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live