ट्रक पुलावरील कठडा तोडुन थेट रेल्वे रुळावर

ट्रक पुलावरील कठडा तोडुन थेट रेल्वे रुळावर


सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक रेल्वे पुलावरील कठडा तोडुन खाली रेल्वे रुळावर कोसळला. या घटनेत ट्रकचे नुकसान झाले असून जीवित हानी झाली नाही. आज  सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मोहोळमार्गे सोलापूरच्या दिशेने चाललेला मालट्रक वडवळ गावच्या पुलावरुन वीस फूट खाली कोसळला. या ट्रकमध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे डांबराचे  ड्रम होते. ट्रक थेट रेल्वे रुळावर कोसळल्याने रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. ट्रक ड्रायव्हर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: truck collapse on railway track at solapur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com