मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जाहीर

 मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जाहीर

मुंबई : मुंबईसह, नवी मुंबई व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार आगमन केलंय. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून (ता. 3) पुन्हा जोर धरलाय. मुंबईत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरारोड, पालघर या भागात पाऊस बरसला. त्यामुळे माटुंगा, दादर, हिंदमाता, करीरोड, सायन, चिंचपोकळी, अंधेरी, विलेपार्ले या भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
 

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही रेल्वे स्थानकांवर रूळावर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.

काल (ता. 3) मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर भरतीमुळे हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे दीड दिवसांचे गणपती समुद्रात विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिकेने बंदी केली होती. 
 

Web Title: orange alert declares in Mumbai by IMD

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com