रतुल पुरी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा

 रतुल पुरी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा

नवी दिल्ली : इटाली येथील फिनमेकानिका कंपनीची ब्रिटिश उपकंपनी असलेल्या ऑगस्टावेस्टलँडकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्यात अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा रतुल पुरी याच्यांवर   दाखल करण्यात आला होता. ईडीने बुधवारी पुरी याला अटक केली होती आणि त्याला १ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
  ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांचा पुतण्या रतुल पुरी याची गुरुवारी ६ दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली.

या व्यवहारातील पैशाचा स्रोत आणि कलंकित पैसा कशासाठी वापरला गेला हे शोधून काढण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने त्याच्या कोठडीतील चौकशीची मागणी केली आहे, याची नोंद घेऊन विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी पुरी याला ११ सप्टेंबपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले.

WebTittle : Ratul Puri is guilty of financial misconduct

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com