शिवेसना प्रवेशावर छगन भुजबळ यांचं उत्तर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात भुजबळ अनुपस्थित होते. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. पण, आज या सगळ्या चर्चांना स्वतः भुजबळ यांनी पूर्ण विराम दिला आहे.

भुजबळ राहिले ठाम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात भुजबळ अनुपस्थित होते. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. पण, आज या सगळ्या चर्चांना स्वतः भुजबळ यांनी पूर्ण विराम दिला आहे.

भुजबळ राहिले ठाम

छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर अनेकदा खुलासे केले होते. टीव्ही चॅनेल्सवर त्यांनी मुलाखती देऊन, या निव्वळ चर्चा आहेत, असे म्हटले होते. पण तरीही त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरूच होत्या. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहिले आणि या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात सुरू आहे. ज्या जागांबाबत अद्याप होऊ शकलेले नाही. त्याबाबत या बैठकीत मार्ग काढला जाण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात ही बैठक होत आहे. या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीच्या समर्थकांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. सध्या काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. त्यापार्श्वभूमीव भुजबळ यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयाचा खूप मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असता. पण, भुजबळ पहिल्यापासून ‘असे काही  नाही,’ असे सांगत होते आणि त्यावर ठामही होते.

इंदापूरचे काय होणार?

बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, पुरंदर, जुन्नर या जागांबाबत बैठकीत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडील इच्छुकांनी तयारी केलेल्या मात्र, कॉंग्रेसकडे जागा असलेल्या मतदार संघाबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. जागावाटपाचे गणित सोडविल्यानंतर विधानसभा प्रचाराची रणनीतीही या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: ncp leader chhagan bhujbal present at parties core committee meeting in pune Shiv sena


संबंधित बातम्या

Saam TV Live