थांबा  प्रवाशांनो, पुणे नगर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

वाघोली : ''वाघोलीत आज 18 सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन होणार आहे. ही मिरवणूक मुख्य पुणे नगर महामार्गावरून निघत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटा दरम्यान महामार्गाच्या एकाच बाजूने होणार आहे. परिणामतः वाहतूकीचा वेग मंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सायंकाळी 6 ते 12 दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा'', असे आवाहन पोलिस निरीक्षक दगडू हाके व सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे. 
                 
वाघोलीत काही मंडळे वगळता अन्य मंडळांचे नवव्या दिवशी विसर्जन होते. यंदा विसर्जन मिरवणुकीत 18 मंडळे सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक पुणे नगर मुख्य मार्गावरून निघते. यामुळे पुण्याहूननगरकडे जाणारा मार्ग सायंकाळी 6 ते 12 दरम्यान वाहतूकीसाठी बंद असतो. दोन्ही बाजूची वाहतूक नगरहुन पुण्याकडे जाणाऱ्या एकाच बाजूच्या महामार्गावरून होते. परिणामतः वाहतूकीचा वेग मंद असतो. 

आजच्या विसर्जन मिरवणुकीसाठी चार अधिकारी, 43 पोलीस कर्मचारी, 20 होमगार्ड, पोलिस मित्र, अकादमीचे विद्यार्थी नियंत्रणासाठी असणार आहेत. आज रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी आहे. सायंकाळी 6 नंतर मंडळे महामार्गावर येतील. ही मिरवणूक बघण्यासाठी नागरिक दुतर्फा गर्दी करतात. यामुळेही वाहतूकीला अडचण होते. नागरिकांनी या वेळेत महामार्गावर येऊ नये अथवा पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

महिला पोलीस मित्र प्रथमच रस्त्यावर
केसनंद कोलवडी येथील 16 महिला पोलीस मित्र प्रथमच मिरवणूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचार्याबरोबर रस्त्यावर उतरणार आहेत. 

पर्यायी मार्ग
मार्ग क्रमांक 1  : येरवडा अथवा विमानगर येथून, विश्रांतवाडी, लोहगाव आळंदी मार्गे सरळ लोणीकंद येथे पुणे नगर महामार्गावर येता येईल
मार्ग क्रमांक 2  : भोसरी चाकण येथून आळंदी मार्गे सरळ लोणीकंद .अथवा चाकण येथून सरळ शिक्रापूर  
मार्ग क्रमांक 3  : हडपसर, थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, मार्गे सरळ लोणीकंद. 

Web Title: Use Alternate routes due to One-way traffic on Pune city highway

संबंधित बातम्या

Saam TV Live