चंद्राबाबू नायडूसह त्याचा मुलगा नजरकैदेत

चंद्राबाबू नायडूसह त्याचा मुलगा नजरकैदेत


हैदराबाद : आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांच्या मुलाला नदरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडून आज चलो आत्मकूर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसविरोधात चंद्राबाबू नायडू करणार असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्राबाबूंसह त्यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही नजरकैदत ठेवण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात टीडीपीकडून आत्मकूर येथे मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाची आक्रमकता पाहून प्रशासनाने नरसरावपेटा, सत्तनपल्ले, पालनाडू आणि गुरजला येथे जमावबंदी लागू केली आहे.

टीडीपीला मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी राज्यभरात 12 तासांचे उपोषण करण्याचे आवाहन करत राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे. राज्याचे डीजीपी गौतम सावंग यांनी मंगळवारी काही भागांत जमावबंदी लागू करण्याची सूचना करत बैठका आणि मोर्चांना परवानगी नाकारली. त्यानंतर आता चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलालाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे.



Web Title: Chandrababu Naidu son Nara Lokesh put under preventive detention in Andhra pradesh

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com