पंतप्रधान मोदींना  संजय भन्साळी देणार बर्थ-डे गिफ्ट

पंतप्रधान मोदींना  संजय भन्साळी देणार बर्थ-डे गिफ्ट

मुंबईः  पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक खास गिफ्ट देणार आहे'मला वाटतंय की ही अशी कहाणी आहे जी सर्वांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे.' असं संजय लीला भन्साळी यांनी म्हटलं आहे. तर, 'माझ्यासाठी ही एक अशा माणसाची गोष्ट आहे जो स्वतःला शोधण्यासाठी निघाला आणि आज देशातील सर्वात मोठा नेता झाला.' असं चित्रपटाचे लेखक संजय त्रिपाठी यांनी सांगितलं,
पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'मन बैरागी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज लाँच होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं पहिलं पोस्टर सुपरस्टार प्रभासच्या हस्ते लाँच होणार आहे.


नरेंद्र मोदींचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. भन्साळीसोबत महावीर जैन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून संजय त्रिपाठी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या आधीही महावीर जैन यांनी 'चलो जीते है' या मोदींच्या बालपणावर आधारित शॉर्टफिल्मची निर्मिती केली होती. या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Web Title:  Birthday gift will be given to PM Modi as Sanjay Bhansali


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com