बोरिवली रेल्वे पोलिसांनी जप्त केला साडेसात कोटींचा ऐवज जप्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांतून गुजरातला जाणाऱ्या गुजरात एक्स्प्रेसमधून अनधिकृतपणे कोट्यवधींची रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना मिळाली. यानुसार बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर पवार यांनी मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास बोरिवली स्थानकात सापळा रचला. यावेळी गुजरात मेलमधील एस-५, एस-६ आणि एस-७ या डब्यांमध्ये तपासणी केली. तपासणीत तब्बल ३५ बॅगा भरून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांतून गुजरातला जाणाऱ्या गुजरात एक्स्प्रेसमधून अनधिकृतपणे कोट्यवधींची रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना मिळाली. यानुसार बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर पवार यांनी मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास बोरिवली स्थानकात सापळा रचला. यावेळी गुजरात मेलमधील एस-५, एस-६ आणि एस-७ या डब्यांमध्ये तपासणी केली. तपासणीत तब्बल ३५ बॅगा भरून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात १० लाखांच्या रोख रकमेसह हिऱ्यांचे हार, सोन्याचे दागिने यांचा समावेश होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

राज्यात निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. यातच रेल्वे पोलिसांनी मेल-एक्स्प्रेसमधील पैशांच्या व्यवहारांवर टाच आणण्यासाठी कंबर कसली. निवडणुकांची आचारसंहिता लागलेली असताना बोरिवली रेल्वे पोलिसांनी तब्बल साडे सात कोटींचा ऐवज जप्त केला आहे. यात रोख रकमेसह हिरे, सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणूक हंगामातील रेल्वे पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोख रक्कम मतदारांना भुलवण्यासाठी वापरण्यात येणार होती का, याचा सध्या रेल्वे पोलिस शोध घेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग भरारी पथक, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तीन हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होती. यामध्ये रोख रक्कम, दारू, दागिने, साड्या, कपडे तसेच इतर भेटवस्तूंचा समावेश होता.

लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही मतदार, कार्यकर्ते यांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रलोभने, आमिषे दाखविण्याची शक्यता आहे. तसेच पैसे वाटप, दारू वाटपाप्रमाणे भेटवस्तूंचेही छुप्या पद्धतीने होणारे वाटप रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने केवळ रेल्वे पोलिसच नव्हे, तर राज्यातील अन्य यंत्रणांनाही खडा पहारा देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title 7 crore cash and jewellery seized by borivali railway police in mumbai

 


संबंधित बातम्या

Saam TV Live