यवतमाळमध्ये 7 जणांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू

sanitizer
sanitizer

यवतमाळ - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देशात थैमान घातलं आहे.राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Maharashtra Government ब्रेक द चेन या अभियानाखाली आणखी कठोर निर्बंध आणले आहेत. यामुळे दारूची दुकान बंद आहेत.  यातूनच यवतमाळमध्ये भयंकर घटना घडली आहे. दारूची लत भागविण्यासाठी  तळीराम आता  वेगवेगळी शक्कल लढविताना दिसून येत आहेत . 7 die after drinking sanitizer in Yavatmal

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात क्रोनिक अल्कोहॉलिक व्यसनी व्यक्तींनी चक्क सॅनिटायझर प्राशन केले. यात 5 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तर दोन दिवसापुर्वी तल्लफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्राशन करणारे दोघे दगावले होते. आता पर्यंत एकुन 7 तरुणांना जीव गमवावा लागल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.     दत्ता कवडू लांजेवार, नुतन देवराव पाटनकर  , संतोश मेहर,  विजय बावणे असे दगावलेल्या तरुणांचे नांव आहे. त्यातील एकाचे नाव बालू असल्याचे बोलले जात आहे.   

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सोबतच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे दारु दुकाने बंदावस्थेत आहे. तर लपुनछपून चढया दराने विकल्या जात असलेली दारु पिणे न परवडणारे असल्यामुळे व्यसनी तरुण सॅनिटायझरचा वापर नशेकरीता करीत असल्याचे भीषण वास्तव समोर  झाले आहे. काल शहरातील विविध भागातील व्यसनी तरुण एकत्रीत आले आणि सॅनिटायझर पार्टीचा बेत आखला.

30 मीली सॅनिटायझरची नशा एका निप एवढी होत असल्याचा कांगावा करीत त्यांनी मोठया प्रमाणात सॅनिटायझर विकत घेतले. या पार्टीत किमान 6 ते 7 युवक असल्याचे बोलल्या जात असुन त्यांनी मनसोक्त सॅनिटायझर प्राशन केले. काही वेळाने त्यांना मळमळ व उलटया व्हायला लागल्यामुळे त्यांच्या परिवारीक मंडळींनी त्या तरुणांना येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले असता उपचारा दरम्यान 5 तरुणांचा मृत्यू झाला. 7 die after drinking sanitizer in Yavatmal

सॅनिटायझर प्राशन करण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे .काल  शहरातील जैताई नगर येथे वास्तव्यास असलेले गणेश उत्तम शेलार तर सुनिल महादेव ढेंगळे  असे दोघे दगावले होते तर शनिवारी तब्ब्ल 5 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. तर  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन शहरातील अल्कोहोलीक व्यसनी व्यक्ती जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर प्राशन करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे तर सर्वत्र दारुची दुकाने बंद आहे परिणामी दारूचे व्यसनाधीन अन्य प्रकारची नशा करताना दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com