आजचा मुहूर्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे - शहरातील सर्वच  पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने आठही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारचा (ता. ३) मुहूर्त उमेदवारांनी निश्‍चित केला आहे. भाजप, काँग्रेस, मनसेचे उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार अाहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. 

पुणे - शहरातील सर्वच  पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने आठही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारचा (ता. ३) मुहूर्त उमेदवारांनी निश्‍चित केला आहे. भाजप, काँग्रेस, मनसेचे उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार अाहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. 

भाजपने आठही मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले. काँग्रेसनेही आपले तीन उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खडकवासला मतदारसंघातील उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. इतर मतदारसंघांत भाजपला कशाप्रकारे शह- काटशह देता येईल यावर उमेदवार निश्‍चित केले जाणार आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीसह अर्ज भरण्यासाठी कर्वे रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात जाणार आहेत. त्या वेळी राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, खासदार गिरीश बापट यांच्यासह इतर नेते, पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हेही आपआपल्या भागात शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तसेच, भाजपचे डॉ. भरत वैरागे हे बंडखोरी करत कॅंटोन्मेंटमधून अर्ज भरणार आहेत.

आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या शिवाजीनगरमधून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, कॅंटोन्मेंटमधून शहराध्यक्ष रमेश बागवे उद्या अर्ज भरणार आहेत, तर कसबा मतदारसंघातील उमेदवार गटनेते अरविंद शिंदे शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत.  मनसेचे हडपसरचे उमेदवार वसंत मोरे आणि कसब्याचे अजय शिंदे हेही उद्या अर्ज भरणार आहेत, तर कोथरूडचे किशोर शिंदे व शिवाजीनगरचे उमेदवार सुहास निम्हण हे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. 

शिवसैनिकांची बंडखोरी
युतीच्या जागावाटपात शिवसेनेला एकही मतदारसंघ न मिळाल्याने शिवसैनिकही बंडखोरी करणार असून कसबा, खडकवासला आणि हडपसर येथून अर्ज भरले जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, एमआयएम या पक्षाचे उमेदवारही अर्ज भरणार आहेत.

Web Title: Vidhan Sabha 2019 Todays time to fill the nomination form
 


संबंधित बातम्या

Saam TV Live