अजित पवार जळगावला रवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे : भाजपच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये स्थान न मिळालेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नाराज असल्याचे चित्र असताना आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार जळगावला रवाना झाले असून, ते खडसे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

अजित पवार आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातून ते थेट जालना, घनसांगवी याठिकाणी जाणार असून, तेथून ते जळगावला जाणार आहेत. याठिकाणी ते एकनाथ खडसे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी नुकतेच सुरवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू असा इशारा सत्ताधारी भाजप-शिवसेनेला दिला होता. त्यामुळे खडसेंना पक्षात आणून राष्ट्रवादी भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत तर नाही ना हा प्रश्न आहे.

एकनाथ खडसे यांना भाजपने जाहीर केलेल्या दोन्ही याद्यांतून डावलले आहे. मात्र, खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास वर्तविलेला आहे. पक्षाकडून अद्याप त्यांची दखल घेण्यात न आल्याने समर्थकांकडूनही आंदोलन करण्यात येत आहेत.

Web Title: NCP leader Ajit Pawar tour on Jalgaon may be meet Eknath Khadse

संबंधित बातम्या

Saam TV Live