आप'च्या उमेदवाराला जिवे मारण्याची पत्राद्वारे धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

सोलापूर: शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीतर्फे उमेदवार असलेल्या खतीब इज्जतहुसेन वकील (वय 57, रा. न्यू बापूजी नगर, सोलापूर) यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्र पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खतीब वकील यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने पोस्टाद्वारे खाकी रंगाचा बंद लखोटा पाठवला. त्यात आम आदमी पार्टीतर्फे भरलेला फॉर्म मागे घे, नाहीतर खल्लास करू. याद राख उपचार केला तर गोळ्या घालून ठार मारू असा उल्लेख केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रईस शेख तपास करीत आहेत. 

खतीब वकील हे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांच्याकडे आम आदमी पार्टीच्या सोलापूर लोकसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. ते पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. शहर मध्य मतदारसंघात कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे तर शिवसेनेकडून दिलीप माने हे उमेदवार आहेत.

Web Title: Threatened by letter to kill AAP candidate in Solapur

संबंधित बातम्या

Saam TV Live