शिवसेनेच्या संख्याबळात वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

 

मुंबई : शिवसेनेला नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. आतापर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१वर पोहचलंय.

 

मुंबई : शिवसेनेला नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. आतापर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१वर पोहचलंय.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी शंकरराव गडाख यांचे वडिल यशवंतराव गडाख आणि बंधू प्रशांत गडाख देखील उपस्थित होते. उपस्थित सर्वांशी चर्चा केल्यावर मिलींद नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून गडाख कुटुंबाशी चर्चा करून दिली. त्यानंतर शंकरराव गडाख आणि प्रशांत गडाख यांना मिलींद नार्वेकर यांनी तात्काळ मुंबईत मातोश्रीवर आणलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट करून दिली. यावेळी शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंबा देत असल्याचं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं.

राजकीय गणितं बदलली; राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत होणार वाढ?
असे झाले शिवसेनेचे संख्याबळ 61 
प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यापूर्वीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर आहे. बच्चू कडू यांनी अमरावतीमधील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांच्या संघटनेचे रामकुमार पटेल आणि स्वतः बच्चू कडू असे दोन आमदार आहेत. बच्चू कडू यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत, विधानसभेत दोन्ही आमदारांचा शिवसेनाला पाठिंबा असल्याचे पत्र दिले. शिवसेनेला निवडणुकीत 56 जागा मिळाल्या होत्या. कडू यांच्यासह आणखी दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं सभागृहातील संख्याबळ 60 वर गेलं होतं. त्यात आता शंकरराव गडाख यांनी पाठिंबा दिल्यामुळं सेनेचं संख्याबळ 61 झालंय. शेकापचे शामसुंदर शिंदे, रामटेकचे अपक्ष उमेदवार आशिष जैसवाल यांनीही शिवसेनेला पाठिंबा, जाहीर केलाय त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 61 झाले.

Web Title: independent mla shankarrao gadakh supports shivsena maharashtra vidhan sabha
 


संबंधित बातम्या

Saam TV Live