आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख  केंद्रशासित प्रदेश !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर झालेल्या निर्णयानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून जम्मू- काश्‍मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू- काश्‍मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून, या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुरमू यांची जम्मू- काश्‍मीरच्या, तर आर. के. माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुरमू हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत, तर माथूर केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. 

Web Title: Jammu Kashmir and Ladakh Union Territory from today

संबंधित बातम्या

Saam TV Live