पक्ष सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा; बाळासाहेब 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

2014 मध्येही पक्ष फुटेल, या भीतीने कमी महत्त्वाची पदे पदरात पाडून शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यंदा शिवसेनेने भाजपला कथित 50-50 च्या सूत्राची आठवण करून देत मुख्यमंत्रिपदावरही दावा सांगितला आहे. फडणवीस यांनी मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन दिले नव्हते, असे स्पष्ट केले.

 

मुंबई : शिवसेनेतील आमदार संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपकडून केला जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जुनी चित्रफीत व्हायरल केली आहे. यात शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा, असा आदेश बाळासाहेब ठाकरे देत असल्याचे दिसत आहे.

2014 मध्येही पक्ष फुटेल, या भीतीने कमी महत्त्वाची पदे पदरात पाडून शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यंदा शिवसेनेने भाजपला कथित 50-50 च्या सूत्राची आठवण करून देत मुख्यमंत्रिपदावरही दावा सांगितला आहे. फडणवीस यांनी मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन दिले नव्हते, असे स्पष्ट केले. तसेच, शिवसेनेचे 18 आमदार संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. 56 पैकी 45 खासदार संपर्कात असल्याचा दावा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची जुनी चित्रफीत व्हायरल केली आहे. यात बाळासाहेब त्यांच्या खास ठाकरी शैलीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना रस्त्यावर अडवा करून तुडवा, असे आदेशच देताना दिसत आहेत. तसेच, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनाही तसेच आदेश देताना दिसत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक समाजमाध्यमांवर ही चित्रफीत व्हायरल केली आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live