शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

फडणवीस म्हणाले, की ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात जी मदत शेतकऱ्यांना करतो, ती मदत आपल्याला शेतकऱ्यांना करायची आहे. मदतीबाबतचे जीआर लवकरच काढण्यात येतील. बांधावर जाऊन शेतकऱ्यांची पाहणी केली. विम्याचा वापर शेतकऱ्यांनी केलेला दिसत आहे. सोयाबीन, ज्वारी, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अकोला : ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे. सरकारी पंचनाम्यावर मदत केली जाईल. शासकीय यंत्रणांची जबाबदारी आहे, त्यांनी सर्वांपर्यंत मदत पोचविली पाहिजे. दुष्काळात देणाऱ्या सर्व मदती हा ओला दुष्काळ समजून करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट  घेतली. फडणवीसांनी म्हैसपूर, चिखलगावला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अकोल्याचे खासदार संजय धोत्रे उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, की ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात जी मदत शेतकऱ्यांना करतो, ती मदत आपल्याला शेतकऱ्यांना करायची आहे. मदतीबाबतचे जीआर लवकरच काढण्यात येतील. बांधावर जाऊन शेतकऱ्यांची पाहणी केली. विम्याचा वापर शेतकऱ्यांनी केलेला दिसत आहे. सोयाबीन, ज्वारी, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा झाला नसला तरी चालेल, तुम्ही फक्त फोटो पाठविला तर त्याला मदत देण्यात येईल. जास्तीत जास्त दिलासा काम करू. 6 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पंचनामे पूर्ण करणार आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही. पिकांची अवस्था खूप वाईट आहे. शासकीय यंत्रणा सक्षम असली पाहिजे. यंत्रणेची जबाबदारी म्हणून काम करा. सरकारी पंचनाम्यावर मदत करण्यात येईल. पिकवीम्याच्या पावतीवरही शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. पावती नसली तरी पैसे देण्यात येतील. शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी काम करण्यात येत आहे. मदतीसाठी सोपी पद्धत अवलंबिण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईनद्वारे मदत पोचविण्यात येईल. मदतीचा ओघ सरकारकडून आजपर्यंतचा सर्वांत जास्त असेल. 

Web Title: CM Devendra Fadnavis meet rain affected farmers in Akola


संबंधित बातम्या

Saam TV Live