... आणि राष्ट्रीय महामार्गावर उलटली अधिकाऱ्याची गाडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग शाखेच्या अधिकाऱ्यांच्याच गाडीला रविवारी (ता. तीन) अपघात झाला. खराब रस्त्यामुळे टायर फुटून अलिशान गाडी पुलावरून उलटली आणि सुमारे 10 फूट खोलवर पाण्यात पडली. आतापर्यंत 70 बळी घेणाऱ्या या भयंकर जीवघेण्या राष्ट्रीय महामार्गावर सुदैवाने हे अधिकारी बालंबाल बचावले. 

दीड-दोन वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे भाग्य अखेर शनिवारी (ता. दोन) फळफळले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्याकडे लक्ष गेले. "आठ दिवसांत रस्ता दुरुस्त झाला नाही, तर कारवाईला सामोरे जा,' असा आदेशच त्यांनी राणा भीमदेवी थाटात दिला.

त्याच तिरीमिरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग शाखेचे अभियंता प्रशांत औटी रविवारी (ता. तीन) आपल्या सहकाऱ्यांसह बनकिन्होळा येथे काल खचलेल्या नळकांडी पुलाची पाहणी करण्यासाठी आले; मात्र अजिंठा ढाब्याजवळील केऱ्हाळा फाट्यानजीक त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर फुटले आणि ती गाडी नळकांडी पुलाच्या खाली फेकली गेली. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. 

सुदैवाने या अपघातामध्ये वाहनात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या वाहनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग शाखेचे प्रोजेक्ट मॅनेजर रामकृष्णा, अभियंता चांडक, उपअभियंता घोडेकर, इतर अधिकारी श्री. शुक्‍ला, श्रीमती वणवे व श्री. कादरी बसलेले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सिल्लोडला एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते सर्वजण औरंगाबादकडे रवाना झाले.

या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना रोज या रस्त्यावरून प्रवास करताना मरणयातना सहन कराव्या लागतात. याबद्दल सर्व स्तरांतून तीव्र रोष व्यक्त होत असतानाच महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनाला झालेला अपघात चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Accicent on Aurangabad Ajanta Jalgaon road

संबंधित बातम्या

Saam TV Live