लक्ष्य तक पहुंचने में मजा आता है! : संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. सध्या ते माध्यमांमध्ये रोज झळकत आहेत. महायुतीच्या जागावाटपाबद्दल आणि मुख्यमंत्री बदाबाबद दररोज काही ना काही वक्तव्य ते करत आहेत. आज (ता. 4) पुन्हा एकदा ते चर्चेत आले ते म्हणजे त्यांनी केलेल्या हटके ट्विटमुळे!

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. सध्या ते माध्यमांमध्ये रोज झळकत आहेत. महायुतीच्या जागावाटपाबद्दल आणि मुख्यमंत्री बदाबाबद दररोज काही ना काही वक्तव्य ते करत आहेत. आज (ता. 4) पुन्हा एकदा ते चर्चेत आले ते म्हणजे त्यांनी केलेल्या हटके ट्विटमुळे!
संजय राऊत यांनी आज एक ट्विट केले आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. राऊत यांनी त्यांचा व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर 'लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है!' असे लिहिले आहे. तर या फोटोला 'जय हिंद' असे कॅप्शन दिले आहे. या ट्विटवरून शिवसेना व संजय राऊत यांचे ध्येय निश्चित आहे व सध्या त्या ध्येयापर्यंत जाण्याच्या प्रक्रियेचा ते आनंद घेत आहेत, असे स्पष्ट होते. 

आज (ता. 4) सकाळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. 'राज्यपालांची आम्ही आज भेट घेणार असून, ही राजकीय नसून सदिच्छा भेट आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा करणार असून, शिवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

सध्या महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला असून, भाजप व सेना दोन्हीही पक्ष वाटाघाटीच्या तयारीत दिसत नाहीत. भाजप व शिवसेना आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने सत्तेत कोण येणार हे अद्याप निश्चित नाही. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून दररोज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि शिवतीर्थावर शपथ घेईल असे सांगितलेले आहे. तसेच त्यांनी आमच्याकडे 175 चा आकडा असल्याचेही म्हटले आहे.

संजय राऊतांच्या सगळ्याच ट्विट्सची चर्चा!
गेले काही दिवस संजय राऊत सातत्याने काही ना काही सूचक ट्विट करत आहेत. मागील आठवड्यातच त्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ व हाताचा उघडलेला पंजा असे कार्टून ट्विट केले होते. तर 1 नोव्हेंबरला 'साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..!' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी मला जे योग्य वाटते तसे मी ट्विट करतो असे उत्तर दिले होते. आजच्या त्यांच्या या ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

 
 
Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweets his and Uddhav Thackeray s Photo


संबंधित बातम्या

Saam TV Live