आठवलेंनाच मुख्यमंत्री करा : उदयनराजे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सातारा : मंत्रिपद मिळावे म्हणून मी कोणाची मागणी करू. सगळेच तज्ज्ञ आहेत, घेतील निर्णय. नाहीतर चिठ्ठ्या टाका. मी कोणाचे नाव घ्यायचे. सगळेच जवळचे आहेत, असे मत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातून नवीन मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांबाबत व्यक्‍त केले. दरम्यान, सेना-भाजपचा सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, असे रामदास आठवले म्हणत असल्याकडेही त्यांनी मिश्‍किलपणे लक्ष वेधले.

राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, अशी आपण मागणी करणार का? या प्रश्‍नावर उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आता मी कोणाची मागणी करू. सगळेच तज्ज्ञ आहेत. घेतील निर्णय. नाहीतर चिठ्ठ्या टाका. मी कोणाचे नाव घ्यायचे, सगळेच जवळचे आहेत. सगळीच मित्रमंडळी आहेत.
विधानसभेचा निकाल लागून आठवडा होत आला तरी सरकार स्थापन झालेले नाही.

तुम्हाला काय वाटते? कोणाचे सरकार होईल? या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, माझं मला पडलंय. तुम्ही मलाच विचारा, कोणाचे सरकार येणार आणि मला काय वाटते. सेना-भाजपचा सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, असे रामदास आठवले म्हणत आहेत. मला वाटते, सेना-भाजपमध्ये थोडी ताणाताण होईल. पण, सरकार स्थापन होईल. प्रत्येकाला चांगले खाते आपल्याच पक्षाला मिळावे, असे वाटते. तसेच मित्रपक्षांनाही चांगले खाते मिळाले तर ते चांगले काम करून लोकांपर्यंत पोचून त्यांना त्यांचा पक्ष वाढविता येईल.

सेना-भाजपच्या नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. सेना-भाजपचे बोलणे सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होतंय असे वाटत नाही का, यावर उदयनराजे म्हणाले नाही. त्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल.

Web Title: Udayanraje Bhosale Talking about political situation in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live