पहिल्यांदाच आमदार झालेल्या सरोज आहिरेंचा अधिकाऱ्यांना इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या  नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करा. शेतक-याचे एवढे करूनही काम झाले नाही तर संबधित अधिकाऱ्यांना आपण गडचिरोलीला पाठवू , असा इशारा नवनिर्वाचित आमदार सरोज आहिरे यांनी दिला.
 

नाशिक : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या  नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करा. शेतक-याचे एवढे करूनही काम झाले नाही तर संबधित अधिकाऱ्यांना आपण गडचिरोलीला पाठवू , असा इशारा नवनिर्वाचित आमदार सरोज आहिरे यांनी दिला.

देवळाली विधानसभा मतदारसंघातील शेत पिकांच्या नुकसान पाहणी दरम्यान दिला. पहिल्याच दौऱ्यातील त्यांची आक्रमकता दिसली. विविध गावांची पाहणी त्यांनी केली. ''मतदार संघातील शेती पिकांच्या नुकसानीचा अहवाल मी तयार करणार आहे.शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणे , हे माझे कर्तव्य आहे. यात शंकाच नाही. मतदार संघातील शेतकऱ्यांना लालफितीच्या कारभाराचा अडसर निर्माण झाला तर थेट माझ्या मोबाइलवर कॉल करून  संपर्क साधावा, तुमचे काम कोणता अधिकारी टाळतो, ते मी बघतेच," असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,अर्जुन टिळे, यशवंत ढिकले , विलास कांडेकर, रमेश कहांडळ, राजाराम धनवटे , आप्पा सुर्वे, गणेश वलवे, बाळासाहेब म्हस्के, नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अद्यक्ष गणेश गायधनी , राजभाऊ जाधव, निखिल भागवत, तलाठी गोविंद चौधरी  आदी  उपस्थित होते.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live