8 कोटी लोकांना चूल आणि धुरापासून मिळाली मुक्ती  

8 कोटी लोकांना चूल आणि धुरापासून मिळाली मुक्ती  

औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात आले, असेही ते म्हणाले. 

राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, औरंगाबाद शहर नवे स्मार्ट सिटी बनत आहे. हे शहर देशातील व्यापाराचे मोठे केंद्र लवकरच होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी याठिकाणी काम सुरु केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काम केले जाणार आहे. 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजनें'तर्गत 8 कोटी मोफत एलपीजी गॅसची जोडणी करण्यात आली. ज्यांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. या सर्वांचे अभिनंदन करतो. सरकारकडून मोठ्या पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, गावांत एलपीजी देण्यात आले. गॅस सिलिंडरचा तुटवडा होऊ नये, यासाठी पुरवठ्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. ज्यांच्या घरी एलपीजी कनेक्शन नाही, असे एकही घर राहता कामा नये, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. येत्या काळात सर्व घरात पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचा प्रयत्नही सरकारकडून केला जाणार आहे. 


Web Title: 8 crore free LPG gas Connection from the government says PM Narendra Modi
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com