राऊतांची वाट बघत होतो : शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019


अखेर राऊत यांनी शरद पवार यांच्याशी सुमारे 10 मिनिटे चर्चा केल्यानंतर सांगितले, की महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीविषयी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याची पवारांची भूमिका स्पष्ट आहे. मी पवारसाहेबांना भेटलो.

मुंबई : राजकीय परिस्थितीविषयी मी लवकरच बोलणार आहे. मी संजय राऊत यांची वाट बघत होतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (बुधवार) महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार असून, त्यापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांची भेट घेतली. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीत नक्की काय झाले हे माहिती नाही.

अखेर राऊत यांनी शरद पवार यांच्याशी सुमारे 10 मिनिटे चर्चा केल्यानंतर सांगितले, की  महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीविषयी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याची पवारांची भूमिका स्पष्ट आहे. मी पवारसाहेबांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची भूमिका कायम आहे विरोधी पक्षात काम करायचे. 

Web Title: NCP Chief Sharad Pawar meets Shivsena MP Sanjay Raut at Mumbai
 


संबंधित बातम्या

Saam TV Live