रणबीर कपूरची गर्लफ्रेंड दिसणार हॉलीवुड चित्रपटात ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

बॉलिवुड कलाकार हॉलीवुडमध्ये झळकणे हे काही नवीन नाही. मात्र जेव्हा एखादा बॉलिवुड कलाकार हॉलीवुडमध्ये झळकतो तेव्हा चर्चा ही होतेच. आणि अशीच एका अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. सध्या हॉलीवुडमध्ये झळकणाऱ्या कलाकारांमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा ही नावं आहे. आता यात आणखी एका बॉलिवुड अभिनेत्रीचे नाव सामिल होण्याची शक्यता आहे. ही अभिनेत्री म्हणजे रणबीर कपूरची सध्याची गर्लफ्रेंड आलिया भट आहे. 

A post shared by Alia  (@aliaabhatt) on

रणबीर कपूर आणि आलिया भटचं नातं जोरदार चर्चेत आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. 2020मध्ये दोघं लग्नाच्या  बेडीत अडकणार असंही  बोललं जात आहे. मात्र आता आलियावषियीची ही एक नवी बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे आलियाची हॉलीवुडमध्ये काम करण्याची इच्छा.

आलिया भटचा लॉस एंजलेसमधील एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमुळेच  आलिया लॉस एंजेलिसमध्ये एका आंतरराष्ट्रीय मॅनेजरच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे. आलियाला आता हॉलीवुडमध्ये काम करण्याची इच्छा असून तिने त्यासाठी तयारी देखील सुरु केली आहे. तर असही बोललं जात आहे की आलिया तिच्या  फ्रेड्ससोबत सुट्टीसाठी लॉस एंजेलिसला गेली आहे. 

आलिया भट ही बॉलिवुडमधील सध्या आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक आहे.  तिच्या हातात सध्या बरेच बॉलिवुड प्रोजेक्ट्स आहेत. बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत ती 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. तर 'सडक-2'मध्येही आलिया दिसेल. संजय लीला भंसाळींच्या चित्रपटातही आलिया दिसणार आहे. हाताशी इतके चित्रपट असतानाही आलियाची पावलं हॉलीवुडकडे कशी वळली असाही प्रश्न सध्या समोर येत आहे. आता काय खरं आणि काय खोटं हे आलियाच सांगू शकेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live