डीएसकेंना स्वत:चेच घर भाडय़ाने मिळेना

 डीएसकेंना स्वत:चेच घर भाडय़ाने मिळेना

 बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसकेंना स्वत:चेच घर भाडय़ाने मिळणे दुरापास्त झाले आहे. स्वत:चेच घर भाडय़ाने देण्याची त्यांची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. मात्र आपल्या या मागणीसाठी अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले आहेत.

ईडीने बाजारभावानुसार या बंगल्याचे ११ लाख रुपये भाडे द्यावे, अशी मागणी डीएसकेंकडे केली होती. त्यानंतर हा बंगला भाडय़ाने द्यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. पुणे सत्र न्यायालयाने डीएसकेंना याबाबत निर्णय घेण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत २५ सप्टेंबर रोजी संपताच तपास यंत्रणेनं हा बंगला ताब्यात घेतला. त्याविरोधात डीएसकेंनी उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी अपील केले. न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने यावर आदेश न देता याचिकाकर्त्यांना लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली.अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यातील स्वत:चेच घर आपल्या कंपनीला भाडय़ाने देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यासाठी त्यांनी ११ लाख रुपये भरण्याची तयारीही दाखवली होती. मात्र कायद्याच्या तरतुदीत ही बाब बसत नसल्याचे कारण देत न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. ईडीने डीएसकेंचा पुण्यातील डीएसके सिटीतील व्हिला नंबर १ जप्त केला आहे.


Web Title: Dsk Are Reluctant To Rent Their Own Home 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com