VIDEO | पुन्हा पेटलं ऊसदराचं आंदोलन

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

सांगलीत ऊस आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय. जोपर्यंत ऊसदराची कोंडी फुटत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलाय. ऊसदरवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापलाय. ऊसदरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सलग तिसऱ्या दिवशी सांगलीत आंदोलन केलं. विटा जवळच्या उदगिरी साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. तर अंकलखोपमध्ये ऊसाने भरलेले सुमारे 40 ट्रॅक्टरही अडवण्यात आले.  या प्रकारामुळे वाहनमालक आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली.

सांगलीत ऊस आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय. जोपर्यंत ऊसदराची कोंडी फुटत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलाय. ऊसदरवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापलाय. ऊसदरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सलग तिसऱ्या दिवशी सांगलीत आंदोलन केलं. विटा जवळच्या उदगिरी साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. तर अंकलखोपमध्ये ऊसाने भरलेले सुमारे 40 ट्रॅक्टरही अडवण्यात आले.  या प्रकारामुळे वाहनमालक आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. ऊसदराची कोंडी जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत कारखाने सुरु होऊ देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलाय. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live