मुंबईत कोरोनाचे  ८,८०० रुग्ण त्यात ३४३ जणांचा बळी  

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 4 मे 2020

ज्या कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसेल तर त्यांनी घाबरुन जाऊ नये. तसेच मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन दाखल होण्याची घाई करु नये. अशा स्थितीमध्ये आरोग्य खात्याकडून आपणास जवळपासच्या कोरोना काळजी केंद्रात दाखल होण्याविषयी योग्य मार्गदर्शन केले जाईल.

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण मुंबई रेड झोनमध्ये असूनही शहर उपनगरातील रुग्ण संख्येचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. शहर उपनगरातील प्रत्येक भागात १५ हून अधिक कोरोना बाधित आढळल्याने संपूर्णत: रेडझोन करण्यात आला आहे.  ज्या कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसेल तर त्यांनी घाबरुन जाऊ नये.

ज्या कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसेल तर त्यांनी घाबरुन जाऊ नये. तसेच मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन दाखल होण्याची घाई करु नये. अशा स्थितीमध्ये आरोग्य खात्याकडून आपणास जवळपासच्या कोरोना काळजी केंद्रात दाखल होण्याविषयी योग्य मार्गदर्शन केले जाईल. तसेच, केंद्र सरकारच्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना इतर कोणतेही आजार नसतील तर त्यांना घरातच अलगीकरण राहण्याची मुभा देण्यात येईल. मात्र त्यासाठी संबंधित रुग्णांना तसे लेखेदेणे आवश्यक असेल.  आरोग्य खात्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असेल. आरोग्य खात्याने याबाबत शक्य- अशक्यता पडताळून मूल्यमापन केल्यानंतर तशी मुभा देण्यात येईल, असे प्रशानाकडून सांगण्यात आले.  

शहर उपनगरात पालिकेच्या विविध रुग्णालयांत ४६९ संशयित कोरोना रुग्ण दाखले झाले, तर आतापर्यंत ११ हजार ४६४ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. तर दिवसभरात १०० जणांना डिस्चार्ज करण्यात आला, तर आतापर्यंत शहर उपनगरातील १ हजार ८०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.या अहवालात ३० एप्रिल व १ मे पर्यंतच्या प्रयोगशाळांमध्ये झालेल्या ६० कोरोना  चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाल्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. 

शहर उपनगरात रविवारी ४४१ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ८ हजार ८०० झाली आहे. तर २१ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ३४३ वर पोहोचला आहे. शहरात रविवारी मृत्यू झालेल्या २१ रुग्णांपैकी १० जणांना काही दीर्घकालीन आजार होते, तर ७ जणांचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. त्यातील १२ जण पुरुष व ९ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० वर्षांहून अधिक होते. तर अन्य ११ जणांचे वय ६० हून अधिक होते. उर्वरित ९ जणांचे वय ४० ते ६० मधील आहे. 

 

WebTittle :: Of the 8,800 corona patients in Mumbai, 343 died


  


संबंधित बातम्या

Saam TV Live