VIDEO | पैसे नाही आता चक्क एटीएम मशिनची चोरी 

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

आजवर तुम्ही पैशांची चोरी झाल्याचं पाहिलं असेल. गाड्यांची चोरी झाल्याचं ऐकलं असेल. पण आता तर थेट एटीएम मशिन चोरणारी गँग राज्यात सक्रिय झालीय. या टोळीनं एटीएम मशिन उखडून न्यायला सुरुवात केलीय. पिंपरी, औरंगाबाद, संगमनेर, नागपूर शहरात ही गँग सक्रिय झालीय. हरयाणाच्या मेवाती टोळ्या म्हणून ही गँग कुप्रसिद्ध आहे.

या गँगची मोडस ऑपरेंडीही खतरनाक आहे. निर्जन स्थळी असलेल्या एटीएमची ही गँग रेकी करते, त्यानंतर रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरमध्ये घुसून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर ही गँग स्प्रे मारते. कॅमेरे बंद पडले की थेट एटीएम उखाडून ही गँग पोबारा करते. वर्षभरात एकट्या पिंपरीत १३ तर पुण्यात ११ एटीएम या गँगनं उखडलेत. पुरातन काळापासून मेवाती टोळ्या दिल्लीवर हल्ला करुन लूट करत असल्याचा इतिहास आहे. आधुनिक काळात या टोळ्यांनी देशभर जाळं विणलंय. आता याच एटीएम गँगची नजर महाराष्ट्रावर पडलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live