जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 डिसेंबर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 डिसेंबर 2019

बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण 14, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 7.07, सूर्यास्त 6.04, दर्श-वेळा अमावास्या, ख्रिसमस, भारतीय सौर पौष 4, शके 1941. 

मेष : अडचणी संपलेल्या नाहीत. यशासाठी थांबावे लागेल. कोणत्याही गोष्टी घाईघाईने करू नका. 

वृषभ : व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करू शकाल. सुधारणा करू शकाल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

मिथुन : तुम्हाला प्रत्येक बाबतीत सावधगिरी ठेवण्याची गरज आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

कर्क : तुमच्या योजना सफल होणार आहेत. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होणार आहे. तुम्ही आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. 

सिंह : प्रवास सुखकर होतील. खर्च वाढणार आहेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमचे क्षेत्र व्यापक होणार आहे. तुमचे नियोजन योग्य ठरणार आहे. 

तूळ : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. आर्थिक क्षेत्रात नवीन दिशा सापडेल. 

वृश्‍चिक : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

धनू : अडचणी संपलेल्या नाहीत. सर्व व्यवहारात विशेष दक्षता घ्यावी लागेल. फसवणुकीची शक्‍यता आहे. 

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडाल. 

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायावर तुमची चांगली पकड राहणार आहे. 

मीन : बॅंकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रगती वेगाने होणार आहे. 

Web Title: Horoscope and Panchang of 25 December 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live