BREAKING | तळेगावजवळ शालेय सहलीच्या बसचा अपघात, 15 विद्यार्थी जखमी

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 25 डिसेंबर 2019

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झालाय.  अपघातात १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे तळेगाव मार्गावर हा अपघात घडला असल्याचं समजत आहे. 

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसनं पाठीमागून जोरदर धडक दिली. बसमध्ये ४० हून अधिक विद्यार्थ्यी होते, जोरदार धडक बसल्यानं १५ विद्यार्थी आणि ३ शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ऊस रस्त्यावर सांडल्यानं जुन्या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Web Title:Accident at talegaon 15 school children injured

संबंधित बातम्या

Saam TV Live