उस्मानाबाद जिल्ह्यात 9 दिवसांचा जनता कर्फ्यू ( पहा व्हिडिओ )

curfew.
curfew.

उस्मानाबाद - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. 

उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर kaustubh diwegaonkar यांनी 15 मे सकाळी 7 ते 24 मे सकाळी 7 वाजेपर्यंत असा 9 दिवसांचा जनता कर्फ्यूचे Curfew आदेश जारी केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने shops आस्थापना बंद राहणार असून लोकांना विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी असणार आहे.

अत्यावश्यक सेवेत दवाखाने, लसीकरण,औषधी दुकाने,टॅक्सी , ऑटोरिक्षा, सार्वजनिक बसेस वाहतूक,मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, एटीएम,विद्युत आणि गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा पूर्णवेळ तर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पपं हे सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहतील. त्याचबरोबर कृषी विषयक सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 12या वेळेत सुरू राहतील.या 9 दिवसांच्या जनता कर्फ्यु काळात भाजीपाला,फळ विक्री , किराणा दुकान , बेकरी आणि इतर आस्थापना दुकाने बंद राहतील.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com