९० वर्षाच्या आजीबाईने केली कोरोनावर मात

राजेश काटकर
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

परभणी शहरातील आंबेडकर नगर येथील वयोवृद्ध  नाबदाबाई आदोडे या ९० वर्षाच्या आजीने जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करीत कोरोना आजारावर मात केली आहे

परभणी : शहरातील आंबेडकर नगर येथील वयोवृद्ध  नाबदाबाई आदोडे Nabdabai Adode या ९० वर्षाच्या आजीने जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करीत कोरोना Corona आजारावर मात केली आहे. नाबदाबाई आदोडे यांनी जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. The 90-year-old grandmother overcame Corona

नाबदाबाई यांची मागील पंधरा दिवसांपूर्वी हॉस्पिटलला आरटीपीसीआर RT- PCR टेस्ट केली होती. त्या टेस्ट मधून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लक्षणे पाहता त्यांना कोविड Covid सेंटरमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आजीने केवळ सात दिवसात कोरोनावर मात केली व घरी आल्या नंतर त्या रोज काढा, हळदीचे दूध, अंडी व डॉक्टरांनी दिलेले औषधे आणि कोमट पाणी नियमित घेतात.  

घरच्या वातावरणात राहिल्याने व योग्य आहार व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब केल्याने त्यांच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा झाली. त्या कोरोनामुक्त झाल्या असून आज आपल्या परिवारसह राहत आहेत. आजीची इच्छाशक्ती इतकी दांडगी आहे, की ९० वर्षाच्या आजी म्हणतात. मी कोरोनाला हरवून घोड्यासारखी झाले आहे. आजीने कोरोना बाधित रुग्णांना जीवनात जगण्याची नवी उमेद दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live