खुशखबर! 1 जानेवारीपासून सरकार देणार 1 तोळं सोनं

खुशखबर! 1 जानेवारीपासून सरकार देणार 1 तोळं सोनं

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक भन्नाट खुशखबर आहे. एक जानेवारीपासून आसाम सरकार कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या मुलीच्या लग्नात 10 ग्रॅम सोन्याचा आहेर करणार आहे. 

सरकारने या योजनेसाठी काही अटी लावल्या आहेत. 'अरुंधती स्वर्ण योजना' असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नवरीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच हे मुलीचे पहिलेच लग्न असणे गरजेचे आहे. आसाम सरकारने या योजनेसाठी तीन महिन्यांसाठी 300 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. 


'अरुंधती स्वर्ण योजने अंतर्गत कोणताही फिजिकल फॉर्म जिला जाणार नाही. लग्नाच्या नोंदणी आणि पडताळणीनंतर नवरीच्या बॅंक अकाउंटमध्ये 30 हजार रुपये जमा केले जाणार आहे. त्यानंतर तिला सोने खरेदीची पावती जमा करावी लागणार आहे. या पैशांचा वापर इतर कोणत्याही वस्तू विकत घेण्यासाठी करता येणार नाही. 

Web Title: Assam government to gift 10 gram gold to every girl in wedding
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com