मुख्यमंत्र्यांकडून नव्या वर्षाच्या शुभेच्छा

सांम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.  स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करूया, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.  स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करूया, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, 'एकविसाव्या शतकातील पहिली १९वर्षे कशी गेली, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या अन्‌ कोणत्या राहिल्या हे बाजूला ठेवून महाराष्ट्राला आनंदी, सुखी-समाधानी बनविण्यासाठी प्रयत्न करू. येणारे वर्ष महाराष्ट्रासाठी नवीन आशा, आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन आले असून सर्वांनी मिळून आपल्या राज्याला आणखी पुढे नेऊ. राज्याला प्रगतीपथावर नेताना गोर-गरीब आणि दुर्बल लोकांचा हात धरून पुढे नेऊया. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच शेतकरी, कामगार, रोजीरोटी कमावणारा मजूर आनंदी होण्यासाठी प्रयत्न करू. महिला, मुलं सुरक्षित आणि समाधानी असण्याबरोबरच प्रत्येकाच्या हाताला रोजगार, जगातले सर्वोत्तम शिक्षण, सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे आरोग्य देण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करू.' अश्या शुभेच्छा दिल्यात 

Web Title: happy new year to the chief minister
 
संबंधित बातम्या

Saam TV Live