VIDEO | दादांनाही डेंजर दालनाची भीती?

राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई
गुरुवार, 2 जानेवारी 2020

मंत्रालयाचा सहावा मजला... दालन क्रमांक 602.. उर्फ डेंजर दालन... या दालनाने आजवर अनेकांना असा काही फटका दिलाय... की आता कुणीच या दालनाची किल्ली स्वीकारत नाहीए... अगदी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारे अजित पवार सुद्धा... अजितदादांनीही हे डेंजर दालन नाकारलंय...

 या दालनाचं आणि अजित दादांचंही जुनं नातं आहे.... 
अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तेव्हा ते याच दालानात बसायचे. त्याचदरम्यान त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि आघाडीची सत्ताही गेली.  पुढे एकनाथ ख़डसे, पांडुरंग फुंडकर, डॉ. अनिल बोंडे यांच्यासाठीही हे दालन डेंजरच ठरलं... ठाकरे सरकार आल्यानंतरही कुठलाच मंत्री या दालनासाठी इच्छुक नव्हता... त्यात आता अजितदादाही हे दालन स्वीकारत नाहीएत.. त्यामुळे या दालनाचं करायचं काय? आणि शकून-अपशकून मानणाऱ्या मंत्र्यांना पुरोगामी म्हणायचं कसं या प्रश्नाचं उत्तरही शोधावं लागेल... 

संबंधित बातम्या

Saam TV Live