VIDEO | नोटबंदी काळातले व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर
गुरुवार, 2 जानेवारी 2020

नोटबंदीच्या काळात बंदी घातलेल्या नोटांचा समावेश असलेल्या मोठ्या रकमांचा बँकेत भरणा केलेले व्यापारी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यापैकी अनेक सोने व्यापाऱ्यांना आता आयकर विभागाने वसुली नोटीसा जारी केल्यात. मंगळवारी एकट्या मुंबईतच जवळपास ५०० सोने व्यापाऱ्यांना अशा नोटीसा मिळाल्याने व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलंय

8 नोव्हेंबर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली होती. तसंच बंदी घालण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांचा नोटा त्या दिवशीच्या मध्यरात्रीपर्यंतच व्यवहारात वापरण्याची मुभा दिली होती. असं असतानाही अनेक व्यापाऱ्यांनी नोटाबंदीनंतरचे काही दिवस बंदी असलेल्या नोटा स्विकारण्याचा सपाटा लावला होता. विशेष म्हणजे gfx in सोने व्यापाऱ्यांनी नोटबंदीच्या काळात मोठ्या रकमांचा भरणा बँकांमध्ये केला होता. जयपूर आणि गुजरातमधल्या काही सोने व्यापाऱ्यांनी तर एका दिवसांत १०० कोटींपर्यंतची रक्कम बँकांमध्ये भरली होती. आता या सर्व व्यापाऱ्यांना कराची रक्कम, दंड आणि त्यावेळी भरलेल्या रकमांवरील व्याज भरावं लागणार आहे. या निर्णयाविरोधात अपिल करायचं असल्यास दंडाच्या रकमेपैकी वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून बाजारपेठेत असलेल्या आर्थिक मंदीने व्यापारी अगोदरच चिंतेत आहेत. त्यातच आलेल्या आयकर विभागाच्या या नव्या फतव्याने अनेक लहान व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडण्याची भीती व्यक्त केली जातेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live