मुंबईत थंडीचा जोर वाढला,महाराष्ट्र गारठला

मुंबईत थंडीचा जोर वाढला,महाराष्ट्र गारठला

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून किमान तापमान घसरले आहे. कमाल तापमानाचा पाराही बुधवारी सरासरीहून कमी होता. कमाल तापमान सरासरीहून सांताक्रूझ येथे २.२ अंशांनी कमी, तर कुलाबा येथे १.७ अंशांनी कमी होते.कुलाबा येथे मंगळवारी सरासरीहून दोन अंशांची घट नोंदवत किमान तापमान १७ अंश नोंदवले गेले. वरळी येथे सर्वात जास्त म्हणजे २०.१९ अंश किमान तापमानाची बुधवारी नोंद झाली. विद्याविहार, अंधेरी येथे १७ अंशांहून अधिक, तर वांद्रे-कुर्ला संकुल येथे १६.२७ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून किमान तापमान घसरले आहे. कमाल तापमानाचा पाराही बुधवारी सरासरीहून कमी होता. कमाल तापमान सरासरीहून सांताक्रूझ येथे २.२ अंशांनी कमी, तर कुलाबा येथे १.७ अंशांनी कमी होते.

वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमानात घट नोंदवली आहे. मालेगाव येथे सरासरी तापमानाहून कमाल तापमान ४.२ अंशांनी खाली उतरले आहे. मालेगावात २५.२ कमाल तापमानाची नोंद झाली, तर जळगावात २५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरीहून ३.५ अंशांनी कमी होते. दिवसभरात राज्यात नाशिकमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.


दिवसभरात राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी मराठवाड्यात एखाद-दुसऱ्या ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.वर्धा येथेही सरासरीपेक्षा कमाल तापमानात ७.१ अंशांची घट होऊन हे तापमान २०.५ अंशांवर पोहोचले आहे. किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मराठवाड्यात मात्र बुधवारी किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याची नोंद झाली. कमाल तापमान सरासरीइतके किंवा सरासरीहून थोडे कमी होते. या तुलनेत किमान तापमानाचा पारा मात्र सरासरीपेक्षा २.५ ते ४ अंशांनी अधिक होता. सोलापूर येथेही किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५ अंशांनी जास्त होता. सोलापूरचे किमान तापमान २०.३ अंश होते. विदर्भाचा कमाल तापमानाच्या पाऱ्यात सरासरीपेक्षा घट झाली आहे. अमरावती येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ८.१ अंशांनी खाली उतरले. अमरावती येथे कमाल तापमान २०.६ अंशांवर पोहोचले आहे, तर किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस आहे. 


Web Title cold wave hits mumbai, maharashtra as temperature drops further

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com