जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 जानेवारी
पंचांग 2 जानेवारी 2020
गुरुवार : पौष शुद्ध 7, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 7.10, सूर्यास्त 6.09, चंद्रोदय दुपारी 12.06, चंद्रास्त रात्री 11.56, दुर्गाष्टमी, भारतीय सौर पौष 12, शके 1941.
मेष : तुमच्या राशीला, शुभ कार्याला दिवस चांगला नाही. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात परिस्थिती अनुकूल होईल. संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.
मिथुन : शुभकार्यासाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी, गुंतवणुकीला चांगला आहे. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहेत.
कर्क : व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. उत्साह, उमेद वाढेल. मेडिकल व वैद्यकीय क्षेत्रात यश मिळेल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.
सिंह : तुमच्या राशीला शुभकार्यासाठी दिवस चांगला नाही. व्यवसायात थोड्या अडचणी जाणवतील. व्यवहारात तडजोडीचे धोरण ठेवणे योग्य ठरेल.
कन्या : शुभकामासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शुभ कामासाठी प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. खर्च योग्य कामासाठी होतील.
वृश्चिक : मुलामुलींच्या संदर्भात सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे.
धनू : प्रॉपर्टीसाठी, गुंतवणुकीसाठी, शुभकामासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाचे निर्णय टाळावेत.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मोठ्या व्यवहारात फसगत होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल.
मीन : आर्थिक क्षेत्रात एखादी भाग्यकारक घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
Web Title: Horoscope and Panchang of 2 January 2020