VIDEO | मोदी सरकारचं शेतकऱ्यांना सर्वात मोठं गिफ्ट

विजय पाटील, जयेश गावंडे, साम टीव्ही
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहेत. देशाभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 11 हजार कोटी रूपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. कर्नाटकमधील तुमकूरमध्ये आयोजित एका समारंभात पंतप्रधान हे पैसे ट्रान्सफर करणार आहेत. 

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 2000 रुपयांचे 3 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याच वर्षात बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हफ्ताही सरकारकडून जमा होणार आहे.

कृषि मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, आतापर्यंत देशभरातील जवळपास 7 कोटी 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणारी काही हफ्त्यांची रक्कम जमा करण्यात आलीय. या योजनेचा फायदा बंगाल वगळता इतर अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना झाला आहे. यातंर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रूपये मदत करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय.

दुष्काळ, अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी पिचून गेलाय. त्यांच्यासाठी वार्षिक 6000 रुपयांची रक्कम म्हणजे खूपच तुटपूंजी आहे, त्यामुळे या मदतीचा खरंच फायदा शेतकऱ्यांना किती होईल हा प्रश्नच आहे. अशा मदतीप्रमाणेच शेतमालाला रास्त हमीभावासंबंधी सरकारनं गांभीर्यानं पावलं उचलणं काळाची गरज आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live