VIDEO | पॉर्न पाहण्यात भारतीय नंबर वन

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

धक्का बसला ना...पण हे खरं आहे...एका पाहणीत हे सत्य समोर आलंय..एकीकडे भारतात स्मार्टफोन्सची विक्री दररोज नवी उंची गाठत असतानाच, या स्मार्टफोनचा वापर चक्क पॉर्न फिल्म पाहण्यासाठी होत असल्याचं एका पाहणीत दिसून आलंय..भारतापाठोपाठ अमेरिकेत सर्वाधिक पॉर्न पाहिले गेल्याचं दिसून आलंय.

.

भारतात 2017च्या तुलनेत पॉर्न पाहण्याचं प्रमाण 3 टक्क्यांनी वाढलंय.2019 मध्ये 89 टक्के स्मार्टफोनधारक भारतीयांनी फोनवर पॉर्न पाहिलं...अममेरिकेतील 81 टक्के स्मार्टफोनधारकांनी फोनवर पॉर्न पाहिलंय तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 79  टक्के लोकांनी पॉर्न पाहिलंय..युकेमध्ये 74 तर जपानमध्ये 70 टक्के स्मार्टफोनधारकांनी पॉर्न पाहिल्याचं दिसलंय..जगभरातील 4 पैकी 3 जण मोबाईल फोनवर पॉर्न पाहतात..पॉर्न हब नावाच्या एका वेबसाईटच्या पाहणीत ही माहिती समोर  आलीय..स्मार्ट फोनमुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झालंय... भारतात स्वस्त डेटा प्लान आणि स्मार्टफोनच्या किमतीत झालेली घट यामुळे पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातंय..

 

 

 

स्मार्टफोनमुळे संपर्कक्षेत्रात क्रांती झालीय...सर्व जग हाताच्या तळव्यावर आलंय..मात्र, याच स्मार्टफोनचा वापर जर पॉर्न पाहण्यासाठी होत असेल तर मात्र ही काळजीची गोष्ट आहे..


संबंधित बातम्या

Saam TV Live