VIDEO | अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात ट्वीस्ट

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही
शनिवार, 4 जानेवारी 2020

ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल... ज्यांच्या आवाजातल्या भजनांनी आजही देशातल्या अनेक घरांत पहाट होते.. मात्र त्यांच्या आयुष्यात आजची पहाट झोप उडवणारी ठरलीए... कारण एकाएकी एका महिलेनं त्यांना आई म्हटलंय.... नुसतंच आई म्हटलं नाही.. तर आईकडे 50 कोटी रुपयांची मागणी केलीए... 
हीच आहे अनुराधा यांची कथित मुलगी.... करमाला मोडेक्स... ती 45 वर्षांची आहे... केरळच्या तिरुवनंतपुरम मध्ये ती राहते... तिनेच अनुराधा यांच्याबद्दल खळबळजनक दावा केलाय... 

 मी चार दिवसांची होते तेव्हा अनुराधा यांनी मला माझ्या सध्याच्या आई वडिलांकडे सोडलं.... पाच वर्षांपूर्वी मरण्याआधी माझ्या बाबांनी मला हे सत्य सांगितलं... तेव्हापासून मी अनुराधा यांना फोन वरुन संपर्क करण्याचा प्रयत्न करते आहे... 

 करमालाने आता अनुराधा यांच्या विरोधात कोर्टात दाद मागितलेय... 27 जानेवारीला याप्रकरणात सुनावणी होणारए... करमाला डीएनए टेस्ट करायलाही तयार आहे.. शिवाय तिने नुकसान भरपाई म्हणून अनुराधा यांच्याकडे 50 कोटींची मागणी केलीए.... 
 अनुराधा पौडवाल यांनी हे सगळे दावे फेटाळलेत... मात्र करमला आपल्या दाव्यावर अडून आहेत... त्या आईविरोधात कोर्टात लढाई लढणार आहेत... त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं... हे आता सुनावणी अंतीच ठोसपणे सांगता येईल... 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live