VIDEO | रिक्षाच्या मीटरमध्ये हेराफेरी ?

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर
मंगळवार, 7 जानेवारी 2020

रिक्षानं तुम्ही कधी प्रवास करत असाल तर मीटरकडे लक्ष ठेवा...कारण, सोशल मीडियावर रिक्षाच्या मीटरचा फोटो व्हायरल होतोय...कोल्हापुरात रिक्षा चालक मीटरमध्ये हेराफेरी करत असल्याचा दावा करण्यात आलाय...त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा...

कोल्हापूर रेल्वे स्थानक येथून अंबाबाई मंदिरापर्यत प्रवास केल्यास 20 रुपये भाडं होतं...पण, हेराफेरी केलेल्या मीटरमध्ये 42 रुपये 10 पैसे इतकं भाडं झालं

हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी पडताळणी केली...दोन ते तीन रिक्षानं त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानक ते अंबाबाई मंदिरापर्यंत प्रवास केला.. पण, या रिक्षाचा मीटर बघा...जेवढं भाडं अंबाबाई मंदिरापर्यंत होतं, तेवढंच भाडं या मीटरमध्ये दाखवलं जातंय...त्यामुळं रिक्षा चालकाकडूनच या मीटरबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...

कोल्हापुरात अनेक रिक्षा आहेत...सध्या तीन कंपन्यांचे रिक्षा मीटर रिक्षांना लावलेयत...त्यामुळं या मीटरमध्ये नक्की काय सिस्टिम आहे, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...मग काय सत्य समोर आलं पाहा...

वेगवेगळ्या मॉडेलचे मीटर लावण्यात आलेयत . काही मीटरमध्ये डॉट पैसे दिसतात तर काही मीटरमध्ये वेळ आणि किलोमीटर दिसतेनवीन रिक्षांतील मीटरमध्ये रुपयांच्या ठिकाणी डॉट येतो...

त्यामुळं या मीटरमध्ये हेराफेरी आहे असा मेजेज व्हायरल झाला...प्रत्यक्षात रिक्षात बसल्यानंतर मीटर सुरू झाल्यावर तातडीने हा डॉट दिसत नाही...रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर हा डॉट दिसतो...त्यामुळे हेराफेरी आहे असं वाटतं...त्यामुळं आमच्या पडताळणीत कोल्हापूरात रिक्षाच्या मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचा दावा असत्य ठरला...जर शंका वाटली तर तातडीने रिक्षा चालकाला त्याची चूक लक्षात आणून द्या...

संबंधित बातम्या

Saam TV Live