VIDEO | मांढरदेव गडावर 600 पेक्षा जास्त लोकांवर करणी

सागर आव्हाड साम टीव्ही मांढरदेव गड, वाई
मंगळवार, 7 जानेवारी 2020

झाडाला टांगलेल्या या काळ्या बाहुल्या, टाचण्या, लिंबू आणि हे फोटो...हे चित्र आहे प्रसिद्ध अशा मांढरदेव गडावरचं..दरवर्षी जानेवारी महिन्यात शेकडो भाविक मांढरदेव गडावर येत असतात. पण हे दृश्य पाहिल्यानंतर इथं श्रद्धेच्या नावावर काही समाजकंटकांनी कशाप्रकारे हा अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय हे दिसून येतं. 

खरं तर अंधश्रद्धेला खतपाणी मिळेल असं कोणतंही कृत्य करण्यास इथं स्पष्ट मनाई आहे. तसे फलकही लावण्यात आलेत. पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून काळ्या जादूचे प्रकार केले जातायेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. करणी, भानामती सारखे प्रकार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय. 

याआधी लोणावळा आणि पुण्यात असे करणीचे प्रकार आढळून आले होते. अशाच बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी मांढरदेव गडावर तर अक्षरश: अंधश्रद्धेचा कहर केलाय. यातून गडाचं पावित्र्य धोक्यात आलंय. विज्ञानाच्या युगातही लोक जर अशा अंधश्रद्धांना बळी पडत असतील तर खरंच आम्ही सुशिक्षित, सुजाण आहोत का ? हा प्रश्नच आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live