VIDEO | गेट वेवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं!

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 7 जानेवारी 2020

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) घुसून सुमारे ५० गुंडांनी विद्यार्थी व शिक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे सोमवारी संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक राज्यांमध्ये या हल्ल्यांविरोधात आवाज घुमला. या मारहाणीचे सर्वांत तीव्र पडसाद विद्यापीठे आणि शिक्षणकेंद्रांमध्ये उमटले.जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली आहेत. 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) घुसून सुमारे ५० गुंडांनी विद्यार्थी व शिक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे सोमवारी संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक राज्यांमध्ये या हल्ल्यांविरोधात आवाज घुमला. या मारहाणीचे सर्वांत तीव्र पडसाद विद्यापीठे आणि शिक्षणकेंद्रांमध्ये उमटले.जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली आहेत. 
निषेध मोर्चे, मूक मोर्चे, निदर्शने, ठिय्या आंदोलन करीत विद्यार्थ्यांनी 'जेएनयू' विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त करीतच, दिल्ली पोलिस तसेच विद्यापीठ प्रशासनाचाही निषेध केला.

 

 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) घुसून सुमारे ५० गुंडांनी विद्यार्थी व शिक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे सोमवारी संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक राज्यांमध्ये या हल्ल्यांविरोधात आवाज घुमला. या मारहाणीचे सर्वांत तीव्र पडसाद विद्यापीठे आणि शिक्षणकेंद्रांमध्ये उमटले.जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली आहेत. निषेध मोर्चे, मूक मोर्चे, निदर्शने, ठिय्या आंदोलन करीत विद्यार्थ्यांनी 'जेएनयू' विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त करीतच, दिल्ली पोलिस तसेच विद्यापीठ प्रशासनाचाही निषेध केला. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. गेटवे परिसरात हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली. मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून होते. परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली आहे. आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केला आहे. कोलकात्यातील प्रेसिडेन्सी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही बॅनर झळकावत व घोषणा देत गुंडगिरीचा निषेध केला. याशिवाय पुद्दुचेरी विद्यापीठ, बेंगळुरू विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, डॉ. आंबेडकर विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, चंडिगढ विद्यापीठ, बेंगळुरूमधील राष्ट्रीय लॉ विद्यापीठामध्येही विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली. सोशल मीडियावरही 'एसओएसजेएनयू' हा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. या हल्ल्याचे पडसाद परदेशातील नामवंत विद्यापीठांतही उमटले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि ससेक्स विद्यापीठात मूक मोर्चे काढण्यात आले. नेपाळमधील काठमांडू येथे 'जेएनयू'च्या माजी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तक्रार करूनही पोलिस उशिरा जेएनयू विद्यापीठात पोहोचले, हा जेएनयूतील अनेक विद्यार्थ्यांचा आक्षेप सोमवारी दिल्ली पोलिसांनी फेटाळला. रविवारी रात्री विद्यापीठातील संघर्षाबाबत पोलिसांच्या बिनतारी यंत्रणेकडे तक्रार येताच पोलिस तातडीने विद्यापीठात पोहोचले. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी अतिशय चोख पावले उचलली, असा दावा पोलिस प्रवक्त्यांनी केला. प्रचंड पोलिस फौजफाट्यामुळे 'जेएनयू' प्रांगणात सोमवारी तणावपूर्ण शांतता होती. सर्व ३४ जखमी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर एम्स रुग्णालयातून सोडण्यात आले. त्याचवेळी विद्यापीठ प्रांगणात शेकडो विद्यार्थी क्रांतिकारी गीतांचे गायन करीत होते, तसेच या हल्ल्याविरोधात घोषणाबाजीही सुरू होती. इतर शहरांतील नामवंत विद्यापीठांमध्येही निषेधाचे सूर उमटले. उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रांगणात तिरंगा मोर्चा काढला.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. गेटवे परिसरात हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली. मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून होते. परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली आहे. आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केला आहे. 

कोलकात्यातील प्रेसिडेन्सी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही बॅनर झळकावत व घोषणा देत गुंडगिरीचा निषेध केला. याशिवाय पुद्दुचेरी विद्यापीठ, बेंगळुरू विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, डॉ. आंबेडकर विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, चंडिगढ विद्यापीठ, बेंगळुरूमधील राष्ट्रीय लॉ विद्यापीठामध्येही विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली. सोशल मीडियावरही 'एसओएसजेएनयू' हा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. या हल्ल्याचे पडसाद परदेशातील नामवंत विद्यापीठांतही उमटले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि ससेक्स विद्यापीठात मूक मोर्चे काढण्यात आले. नेपाळमधील काठमांडू येथे 'जेएनयू'च्या माजी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.

तक्रार करूनही पोलिस उशिरा जेएनयू विद्यापीठात पोहोचले, हा जेएनयूतील अनेक विद्यार्थ्यांचा आक्षेप सोमवारी दिल्ली पोलिसांनी फेटाळला. रविवारी रात्री विद्यापीठातील संघर्षाबाबत पोलिसांच्या बिनतारी यंत्रणेकडे तक्रार येताच पोलिस तातडीने विद्यापीठात पोहोचले. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी अतिशय चोख पावले उचलली, असा दावा पोलिस प्रवक्त्यांनी केला.

प्रचंड पोलिस फौजफाट्यामुळे 'जेएनयू' प्रांगणात सोमवारी तणावपूर्ण शांतता होती. सर्व ३४ जखमी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर एम्स रुग्णालयातून सोडण्यात आले. त्याचवेळी विद्यापीठ प्रांगणात शेकडो विद्यार्थी क्रांतिकारी गीतांचे गायन करीत होते, तसेच या हल्ल्याविरोधात घोषणाबाजीही सुरू होती. इतर शहरांतील नामवंत विद्यापीठांमध्येही निषेधाचे सूर उमटले. उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रांगणात तिरंगा मोर्चा काढला. 

 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live