VIDEO|कोल्हापुरात मटणाची आणीबाणी

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर 
बुधवार, 8 जानेवारी 2020

कोल्हापूरच्या मटण दरवाढीचा प्रश्न मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत..कोल्हापूरमधील मटण विक्रेत्यांनी दर परवडत नसल्यानं आणि अन्न औषध प्रशासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून मटण विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सलग दोन दिवस मटणाची दुकानं बंद असल्यानं तांबडा पांढरा रस्सा पिणाऱ्यांची चांगलीच  अडचण झालीय.

दिवाळीपासून मटणाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने कोल्हापूरकरांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मटण दर कमी करावेत यासाठी आंदोलन झालं. अनेक बैठका झाल्या त्यातून मटण दर 480 रूपये प्रतिकिलो करण्याचा निर्णय झाला, मात्र आता बकरयांचा दर वाढल्यानं 480 रूपयाला मटण विक्री परवडत नसल्याचा पवित्रा विक्रत्यांनी घेतलाय.

पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडेच मटणाचे दर चढे आहेत.  साताऱ्यात 4 महिन्यांपूर्वी मटण 520 रूपये किलो होतं.  तर आजचा दर 600 रूपये इतका आहे. 
त्या तुलनेत सांगली मटणाचे दर कमी असून सांगलीत मटणाचा दर 540 रूपये प्रतिकिलो इतका आहे. कराडमध्ये मटणाचा दर 540 रूपये इतकाच आहे. 
 मटणाच्या दरावरून कोल्हापूरकरांची मात्र गोची झालीय. तुर्तास लोकांनी आपला मोर्चा मच्छीकडे वळवलाय. मात्र मटणाची आणीबाणी वेळीच संपली नाही तर मात्र खवय्यांची मोठी अडचण होईल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live