VIDEO | मनसेचा झेंडा भगवामय होणार ?

तुषार रूपनवर साम टीव्ही मुंबई 
बुधवार, 8 जानेवारी 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा आहे. इतकच नाही भविष्यात भाजप हा मनसेचा नवा मित्र असेल अशीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणं जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. 

शिवसेना हिंदुत्वावादी पक्ष असला तरी सत्तेसाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरलाय. महाविकास आघाडीमुळे हिंदुत्वाचा बाणा जपणं शिवसेनेला अवघड होईल. अशात मनसेनं हिंदुत्वाची कास धरून भाजपशी युती केली तर त्यात गैर काय ? असाही सवाल उपस्थित होतोय. 

 मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना थेट पाठिंबा दर्शवला होता. मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पण सध्या दोन्ही पक्ष विरोधात आहेत. मनसेला नव्याने उभारी घ्यायची असेल तर कुणाची तरी साथ घ्यावी लागेल. त्यात आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शुत्रू वा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे भविष्यात मनसे आणि भाजप नव्या मैत्रीपर्वाला सुरवात झाली तर आश्चर्य वाटायला नको. 

संबंधित बातम्या

Saam TV Live