बालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे!

अनुराधा धावडे
सोमवार, 7 जून 2021

देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens   आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार  देशभरात एकूण 9.27 लाख बालके गंभीर स्वरूपात कुपोषित  असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens   आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार  देशभरात एकूण 9.27 लाख बालके गंभीर स्वरूपात कुपोषित  असल्याचे समोर आले आहे.  धक्कादायक बाब म्हणजे मध्यप्रदेशतील बिहारमध्ये सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे कोरोना विषाणू साथीच्या काळात देशात सर्वत्र आरोग्य आणि पोषण आहाराचे संकट अधिक गंभीर झाले  असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एका वृत्तसंस्थेने माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मिळवली असता, महिला व बालविकास मंत्रालयाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशभरात सहा महिन्यांपासून ते सहा वर्षांपर्यंतची बालके ही तीव्र स्वरूपातील कुपोषित असल्याचे समोर आले आहे. (9.27 lakh severely malnourished children registered in India) 

Child malnutrition on a decline in India, Anaemia still a problem: Survey |  Health News – India TV

महिला व महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उत्तरप्रदेशात 3,98,359 आणि बिहारमध्ये 2,79,427 कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर लडाख, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर या राज्यातील कुपोषित बालकांची  कोणतीही गंभीर नोंद करण्यात आली नाही. त्याचबरोबर, लडाख वगळता, भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या मध्यप्रदेशसह अन्य चार राज्यांमधील मधील अंगणवाडी केंद्रांपैकी कोणत्याही आंगणवाडीत  या प्रकरणाचा कोणताही डेटा नोंदविला नाही.

Yemeni Boy Fights Malnutrition as Hunger Stalks Nation's Children | World  News | US News

तथापि,  महिला व बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तीव्र कुपोषित बालकांची लवकारत लवकर ओळख पाठवून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसाच देशातील कुपोषित बालकांचा आकडा हा  9,27,606 वर पोहचला आहे. त्यामुळे आता आधीच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर होणाऱ्या परिणामांची चिंता आणि आता कुपोषणामुळे समोर आलेली आकडेवारी पाहता देशात या य आकडेवारीकडे दुर्लक्ष केल्यास याचे  भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे दिसत आहे. 

Malnutrition in Children: Significant improvement in the last 15 years, but  challenges remain

एचएक्यू सेंटर फॉर चाईल्ड राईट्सचे सह-संस्थापक एनाक्षी गांगुली यांनी याबाबत म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे  देशात बेरोजगारीत वाढ होत आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे, यामुळे देशभरातील मोठ्या प्रमाणात त्यांची उपासमार होत आहे. आणि या उपासमारीचा परिणाम म्हणजेच कुपोषण. त्यामूळे सरकारने कुपोषणाबाबत स्पष्ट नियमावली बनवून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 

Insurgency sentencing children to death through Malnutrition in Northeast-  UNICEF - Espinews

देशात उत्तरप्रदेश आणि बिहार तीव्र कुपोषणाबाबत पहिल्या क्रमांकावर आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात  0 ते 6 वर्षे वयोगटातील 2,97,28,235 (2.97 कोटी / 29.72 दशलक्ष) बालके तर बिहारमध्ये 1,85,82,229 (1.85 कोटी / 18.5 दशलक्ष)  तीव्र कुपोषण ग्रस्त बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार,  महाराष्ट्रात 70,665, गुजरातमध्ये 45,749, छत्तीसगडमध्ये 37,249,ओडिसामध्ये 15,595, तमिळनाडूमध्ये 12489, झारखंडमध्ये 12,059, अंधारप्रदेशांत 11,201, तेलंगाणात 9045, आसाममध्ये 7,218,  कर्नाटकमध्ये 6,899, केरळात 6,188, आणि राजस्थानात 5,732 इतकी बालके  तीव्र  कुपोषणग्रस्त आहेत. देशभरातून दहा लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांमार्फत तीव्र कुपोषणग्रस्त बालकांची नोंद करण्यात आली आहे. 

India needs to holistically tackle child malnutrition - The Financial  Express
  
तथापि, एनाक्षी गांगुली यांनी देशातील कुपोषणाची  ही आकडेवारी पाहता मुलांची पोषण स्थिती सुधारण्यास मदत करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांच्या भूमिकेवर भर दिला.
"अंगणवाड्यांनी अधिक कार्यशील व्हावे आणि लॉकडाऊनमुळे अंगणवाड्यांपर्यंत पोचण्याची शक्यता जर कठीण होत असेल तर अंगणवाड्यांपर्यंत पोचण्याची गरज आहे. मग त्यासाठी काय योजना आहे?" याबाबत अभ्यास होणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. 

Comprehensive Analysis of the Condition of Malnutrition in India - The  Policy Times

राईज अगेन्स्ट हंगर इंडियाचे कार्यकारी संचालक डोला महापात्र यांनीदेखील,  कोविड महामारीमुळे बाळकांच्या खाण्यातील विविधता आणि आहाराची कमतरता अशा परिस्थितीत कुपोषणात आणखी वाढ होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली आहे.  कुपोषणाचे निराकरण करण्यासाठी  घरगुती काळजी आणि सुविधा-आधारित काळजी दोन्ही गरजेची असल्याचे म्हटले आहे. तर तीव्र कुपोषणा अन्नाची उपलब्धता, उपयोग आणि जनजागृतीशी थेट संबंध असल्याने कुटुंबांना फक्त रेशन / अन्नच मिळणे उपयोगाचे नसून सरकारने त्यांच्या योग्य  शिक्षणाची आणि त्यांना सहकारी करण्याचीदेखील गरज आहे, असे डोला महापात्र यांनी म्हटले आहे. तसेच तीव्र कुपोषणाबाबत पोषण पुनर्वसन केंद्रे (एनआरसी) बळकट करणेही अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Malnutrition: India needs to urgently break inter-generational cycle | ORF

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, गेल्या पाच वर्षात देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तीव्र कुपोषणग्रस्त बालकांच्या  वाढत्या अकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. देशात गेल्या पाच वर्षात म्हणजे 2015-16 मध्ये देशात 7.4 टक्के कुपोषणाची नोंद करण्यात आली होती. यात एनएफएचएस 601,509 कुटुंबांची, 699,686 महिला आणि 1,12,122 पुरुषांकडून माहिती गोळा केली.  या सर्वेक्षणात 5 वर्षाखालील 2,65,653 मुलांची माहिती गोळा करण्यात आली.  त्यानंतर एनएफएचएसने गेल्या वर्षी 2015 -16 ते 2019-29 या कालावधतील आकडेवारी तपासली. ज्यात गेल्या पांच वर्षात देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र शासित  प्रदेशांत कुपोषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

Edithed By - Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live