मावळ मधील 98 गावे कोरोनामुक्त....  

दिलीप कांबळे
गुरुवार, 3 जून 2021

राज्यात पुणे जिल्हा कोरोना रुग्णाच्या बाबतीत हॉटस्पॉट होता. सर्वात जास्त रुग्ण पुणे शहरासह ग्रामीण भागात आढळून येत होते. प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अनेक उपाय योजना राबवून ही परिस्थिती जैसे थी प्रमाणे झाली होती. मात्र, अत्ता दिलासादायक झाली आहे. मावळ तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे

मावळ : राज्यात पुणे Pune जिल्हा कोरोना Corona रुग्णाच्या बाबतीत हॉटस्पॉट Hotspot होता. सर्वात जास्त रुग्ण पुणे शहरासह ग्रामीण भागात आढळून येत होते. प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अनेक उपाय योजना राबवून ही परिस्थिती जैसे थी प्रमाणे झाली होती. मात्र, अत्ता दिलासादायक झाली आहे. मावळ Maval तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. 98 villages in Maval free from corona 

191 गावांपैकी 98 गावे ही कोरोनामुक्त झाली आहे. मुंढावरे, टाकवे, शिलाटने, कोठुरणे, मोरमारवाडी, उकसान अशी 98 गावे तर अजून 50 गावे ही कोरोना मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. जाही गावांमध्ये Village एक किंवा दोन रुग्ण आढळत आहेत. मावळ मधून प्रत्येक गावातील सरपंचाकडून आदर्श घ्यावा असं नेत्रदीपक कार्य केल्याने हे शक्य झाल्याची भावना नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.

१२४ वर्षांच्या आजीनं घेतली कोरोनाची लस 

माजी जबाबदारी या सारख्या शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. गावातील कामगार वर्ग नोकरीनिमित्त पुणे- मुंबई Mumbai ला जात असतो.  त्याकरिता गावाबाहेर विलगिकरण कक्ष उभारून, गावातील स्वच्छता कशी ठेवता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष देऊन वेळोवेळी, फवारणी करणे, हात वारंवार धुण्याचे महत्व पटवून दिल्याने या गावांची वाटचाल कोरोना मुक्तीकडे दिसून आली आहे. 98 villages in Maval free from corona

हे देखील पहा 

मावळ मधील सर्व नागरिकांनी कोरोना काळात प्रशासनाचे पोलिसांच्या नियमांचे तंतोतंत पालन केले आहे. शिक्षणाच्या माहेर घरातील उच्चशिक्षित नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालून या ग्रामीण भागातील मावळ्यांनी दाखवून दिलं आहे की हम भी किसींसे कम नही. मावळ तालुक्यातील आशा वर्कर, आरोग्य अधिकारी, सरपंच, तहसीलदार, आमदार यांच्या अधिक प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे. त्यांच्या या कार्यास सलाम मावळ 90 % टक्के कोरोनामुक्तीकडे तर उद्या जिल्हा, राज्य आणि देश 100% कोरोनामुक्त व्हावा हीच प्रार्थना मावळवासीय करत आहे.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live