VIDEO | मुंबईच्या किनारपट्टीवर बँड, बाजा, बारात

VIDEO | मुंबईच्या किनारपट्टीवर बँड, बाजा, बारात

प्रेमीयुगुलांसाठी समुद्रकिनारे म्हणजे हक्काचं ठिकाण...समुद्रकिनारी फिरत, लाटांचा मनमुराद आनंद घेत मावळत्या सुर्याला साक्ष ठेवून अनेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील...पण आता याच समुद्रकिनारी सनई, चौघडे वाजतांना दिसतील. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील भाऊच्या धक्क्याजवळील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल ते आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल परिसरातील सुशोभीकरणाला वेग आलाय. डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनलच्या इमारतीची पुनर्रचना करण्यात येत असून, तिथं अत्याधुनिक सोयीसुविधांचं रेस्टॉरंट उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. टर्मिनलसमोरच्या हिरवळीवर सागराच्या साक्षीने विवाह सोहळे आयोजित करण्यास परवानगी दिली जाणारं. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच समुद्रकिनारी विवाह करण्याची संधी मिळणार आहे.

डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रेस्टॉरन्ट आणि दुसऱ्या मजल्यावर विविध समारंभांसाठी हॉल असेल..याशिवाय हिरवळीवर लग्नसमारंभाची सोय असेल. मार्च महिन्यापर्यंत ही सेवा सुरू होईल. हा परिसर डॉकबाहेर असल्यानं विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्याची गरज भासणार नाही


आपलं लग्न खास डेस्टीनेशनवर व्हावं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मुंबईतल्या तरूण-तरूणींसाठी असंच एक खास लोकेशन तयार होतंय. जिथं समुद्राला साक्ष ठेवून जोडप्यांना सात फेरे घेता येतील. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com