VIDEO | वाघाचा वाघिणीवर जीवघेणा हल्ला !

VIDEO | वाघाचा वाघिणीवर जीवघेणा हल्ला !

माणसाने माणसाची हत्या केल्याचं आपण ऐकलंय...पण, या जंगलातल्या वाघानं वाघिणीला मारून टाकलंय...रागाच्या भरात वाघानं वाघिणीचा जीव घेतलाय...हा सगळा प्रकार पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय...या व्हिडीओत पाहा... हा वाघ वाघिणीला मारत असल्याचं दिसतंय... वाघ ताकदवान असल्यानं वाघिणीचं या वाघासमोर काहीच चाललं नाही... बिचारी वाघिण याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती...पण, मानेलाच पकडल्यानं वाघाच्या तावडीतून सुटणं शक्य नव्हतं...अखेर या वाघिणीनं आपला जीव सोडला...

13 वर्षांची दामिनी वाघिण पुण्यातून राजस्थानच्या उदयपूरला नेली होती...तर कुमार नावाच्या वाघाला कर्नाटकातून आणला होता...दामिनी वाघिणीवर कुमार वाघ हल्ला करत असल्यानं दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं...पण, रागाच्या भरात कुमार वाघानं दामिनी वाघिणीवर हल्ला केला...वाघिणीची मान पकडल्यानं जागच्या जागीच दामिनी वाघिणीचा मृत्यू झाला...

या सर्व प्रकारानंतर केअरटेकरची चौकशी केली जाणाराय...दोन्ही वाघ, वाघिण वेगवेगळ्या ठिकाणी असूनही वाघ कसा काय वाघिणीपर्यंत पोहोचला...? अधिकारी तिथे उपस्थित नव्हते का...? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत...पण, हा प्रकार पहिल्यांदाच उदयपूरमध्ये घडलाय...त्यामुळं माणसांप्रमाणे प्राणीही एकमेकांचा जीव घेतात हे यावरून पाहायला मिळालंय...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com